महाराष्ट्र

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

डोंबिवली : लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन एका २६ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार २९ तारखेला सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या महितीनुसार, रिया राजगोरे (२६) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. डोंबिवलीतील रिया मुंबईत कामाला होती. नेहमी प्रमाणे ती सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकलध्ये चढली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाजाजवळ उभे राहून प्रवास केला. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. २३ तारखेला डोंबिवलीतील अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600