जिल्हा

स्वीकृत नगरसेवक पाचवरून दहावर!

ठाण्यात महायुतीतील इच्छुकांच्या आशा पल्लवित ठाणे: ठाणे महापालिकेत नवीन नियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा होणार असल्याने या जागेवर वर्णी लावण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक सहा जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याने त्या जागेवर कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक मागिल आठवड्यात पार पडली. १३१ नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ७५ जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल भाजपा असून त्यांचे २८नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार १२, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नऊ, एमआयएम पाच, उबाठा आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. मागिल अनेक वर्षे पाच स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जात होते. या वर्षापासून राज्य सरकारने स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा केली आहे. संख्यबाळानुसार प्रत्येक पक्षाला स्वीकृत नगरसेवकांचा कोटा दिला जाणार आहे. कोकण विभागीय आयुक्ताकडे गट निर्माण केल्याचे पत्र दिल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला सहा जागा येणार असून भाजपाच्या पदरात दोन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे तिकीट वाटपात अन्याय झालेल्या इच्छुकांची आणि पक्षाकरिता त्याग केलेल्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाची महायुती झाल्यामुळे अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले होते, परंतु पक्षाचे त्यांनी प्रामाणिकपणे काम करून उमेदवार विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. अशा कार्यकर्त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना कोणाला महापालिकेत पाठवते, भाजपा कोणावर जबाबदारी टाकते, हे पुढील महिन्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600