जिल्हा

बदलापुरात आज दुसऱ्या दिवशीही कारवाई; ३५ अतिक्रमणे पाडली

बदलापुरात आज दुसऱ्या दिवशीही कारवाई; ३५ अतिक्रमणे पाडली
बदलापुरात आज दुसऱ्या दिवशीही कारवाई; ३५ अतिक्रमणे पाडली फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूर नगरपालिकेची अतिक्रमणांवर, अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेली कारवाई आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. दोन दिवसांत नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुमारे 75 अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाई केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बदलापूर पूर्व भागातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट केली. त्यामध्ये अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी रोड, तसेच प्रस्तावित पनवेल रोडवरील अनेक दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर, दुचाकीचे शोरुम, फर्निचर दुकाने आदी चाळीसहून अधिक अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आली होती. मंगळवारीही नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत 35 हून अधिक अतिक्रमणावर व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600