जिल्हा

मनपा कर्मचाऱ्यांनी पक्षाचा प्रचार केल्यास कारवाई होणार

नवी मुंबई: येत्या १५ जानेवारीला नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार असून ही निवडणूक जवळ आली आहे. या दरम्यान नवी मुंबई महापालिका अस्थापनेतील व कंत्राटी कामगार किंवा कर्मचाऱ्यांनी एखाद्या पक्षाच्या प्रचारात किंवा सोशल मिडियावर प्रचार केल्यास त्यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल तसेच शिस्तभंगाची कारवाई देखिल करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिका स्थापनेला ३३ वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक कंत्राटी कामगार तसेच अस्थापनेतील कामगारांचे लोकप्रतिंधीसोबत सौहार्दाचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी आपल्या जवळच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याची शक्यता काही राजकीय नेत्यांनी मनपा आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत वर्तवली होती.
आता मनपा निवडणूक जवळ आली असून ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यानुसार कायमस्वरूपी अथवा कंत्राटी तसेच उपरोक्त नमूद स्वरुपात कार्यरत अधिकारी-कर्मचारी याने कोणत्याही पक्षाच्या अथवा उमेदवाराच्या रॅलीमध्ये सहभाग, विविध सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियामधून एखाद्या उमेदवाराचा पक्षाचा प्रचार करणे, महापालिकेच्या धोरणाविरूद्ध बोलणे किंवा महापालिकेवर टीका करणे, बॅनर्स, पोस्टर्स व प्रचाराची इतर साधने लावणे, त्यांचे वाटप करणे इत्यादी कोणत्याही प्रकारे सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्या कर्मचा-यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600