ठाणे

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्यासाठी अजस्त्र 'टीबीएम' सज्ज!

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्यासाठी अजस्त्र 'टीबीएम' सज्ज!
ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्यासाठी अजस्त्र 'टीबीएम' सज्ज! फोटो: ठाणे वैभव
उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
ठाणे: मागिल अनेक दिवस विविध परवानग्या मिळवण्यामध्ये उशीर झालेल्या देशातील सर्वात लांब  ठाणे-बोरिवली दुहेरी प्रकल्पात टीबीएमद्वारे बोगदा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ७ एप्रिल रोजी होणार आहे.
ठाण्यातील मानपाडा येथून टीबीएमद्वारे या प्रकल्पाचे उदघाटन होणार असून शुभारंभानंतर खऱ्या अर्थाने या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर ठाणे-बोरिवली हा दीड तासांचा प्रवास हा अवघ्या १५ मिनिटात पूर्ण होणार आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.  या प्रकल्पामुळे मुंबई आणि  ठाण्याच्या प्रवासाचा वेळ बराच कमी होणार आहे. ठाणे ते बोरिवली या ११.८४ किलोमीटर लांब रस्त्याच्या प्रवासासाठी सद्यास्थितीत ६० ते ९० मिनिटं लागतात, मात्र नव्या दुहेरी बोगद्यामुळे हा वेळ अत्यंत कमी होऊन केवळ १५ मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे.
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. वनक्षेत्रावर कमीत कमी पर्यावरणीय परिणाम होईल अशा प्रकारे या बोगद्याचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी अॅडवान्स टनल बोरिंग मशीन लावण्यात येणार आहे. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली आहे.
सद्यास्थितीत ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रोडवरुन जावं लागतं. मात्र या रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी एक ते दीड तास लागतो. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील हा प्रकल्प एक भाग आहे. एकूण ११.८४ किमी लांबीच्या मार्गापैकी १०.२५ किमीचा भाग दुहेरी बोगद्याचा असेल.
दोन्ही दुहेरी बोगद्यात एकूण तीन लेन असतील. ज्यामध्ये एक आपत्कालिन लेनचा देखील समावेश असेल. याशिवाय  बोगद्यातून बाहेर पडणं सोपं जावं यासाठी प्रत्येक ३०० मीटरच्या अंतरावर क्रॉस-पॅसेज तयार करण्यात येणार आहे. सोबतच सुरक्षेसाठी बोगद्याच्या आत आग विझवण्याची उपकरणं, स्मोक डिटेक्टर आणि एलईडी आधारित सूचना डिस्प्ले लावण्यात येणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून ठाण्याच्या घोडबंदर रोडला पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडले जाणार आहे.
चौकट
बोगद्याच्या खोदकामासाठी नायक नावाच्या मशीनचा वापर केला जाणार आहे. हे मशीन देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक टीबीएम (टनल बोरिंग मशीन) आहे. या मशीनच्या मदतीने खोदकाम केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600