जिल्हा

अंबरनाथ जय हिंद बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा

अंबरनाथ जय हिंद बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा
अंबरनाथ जय हिंद बँकेने ओलांडला एक हजार कोटींचा टप्पा फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: आपुलकीने वागणारी माणसे ही ओळख असणाऱ्या तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अंबरनाथ जय हिंद बँकेने आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गरजू गरिबांची बँक अशी ओळख असणाऱ्या बँकेने पारदर्शक व्यवहाराची परंपरा जपत ठेवीदार आणि भागधारकांच्या विश्वास राखून बँकेने प्रगतीचा टप्पा ओलांडला असल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी सांगितले. अंबरनाथमध्ये १९८५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या १८ शाखा कार्यरत आहेत. ३० सप्टेंबर २०२५ रोजी बँकेने एक हजार कोटींचा टप्पा पार केला. बँकेच्या एकूण ठेवी ६८८.९४ कोटी, एकूण व्यवसाय १,००९. ६१ कोटी, कर्जे ३२०.६७ कोटी, गुंतवणूक ३८३.४३ कोटी तर निव्वळ नफा ४,५५ कोटी रुपये आहे. सीआरएआर १७.३४ टक्के अशी बँकेची आर्थिक स्थिती असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले, त्यामुळे एनपीएचे प्रमाण ०.४७ टक्के इतके कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने मागील वर्षी जूनपासून १००० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. आणि अखेरीला ३० सप्टेंबर २०२५ रोजी १००० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आपण समाधानी आहोत, असे श्री देसाई म्हणाले. बँकेमध्ये महिला वर्गाला अधिकाधिक प्राधान्य देण्यात आले असून भविष्यात बँकेमार्फत प्रशिक्षण केंद्र सुरु करणे, जय हिंद भवन बांधणे यासारख्या उपक्रमांना चालना देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी २०२५- २६ या आर्थिक वर्षात ११०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापक विजय कुरणकर यांनी सांगितले. बँकेच्या संचालिका रूपा देसाई-जगताप आणि संचालक बी. एल. टिपे, उपाध्यक्ष ॲड.नंदकुमार भोळे आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600