जिल्हा

‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका
‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका फोटो: ठाणे वैभव
ठाणे: गडकरी रंगायतन, ठाणे येथे  २ एप्रिल २०२६ रोजी उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा २०२६ ची अंतिम फेरी पार पडली. पन्नाशी पार केलेल्या तरुणांच्या सळसळत्या उत्साहात दमदार पाच एकांकिका सादर झाल्या. त्यापैकी मित्र सहयोग, ठाणे यांच्या ‘अनोळखी’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका हा प्रथम पुरस्कार पटकावला. रंगा थिएटर्स, ठाणे यांच्या ‘तरुणाई’ ने द्वितीय, तर ठाणे आर्ट गिल्ड यांच्या ‘ती येते आणि जाते’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या आयोजनाने ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी लेखक-दिग्दर्शक विनोद जाधव, अभिनेता संदीप रेडकर आणि अभिनेत्री योगिनी चौक हे परीक्षक म्हणून लाभले होते. तसेच लेखक-दिग्दर्शक विशाल कदम, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर, अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकर,ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री संपदा जोगळेकर, नाट्य परिषद, ठाणे शाखेचे पदाधिकारी नरेंद्र बेडेकर, विद्याधर ठाणेकर, सॉफ्ट कॉर्नरचे एमडी व सीईओ दिलीप कुलकर्णी आणि मिसेस कुलकर्णी यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक पारितोषिके: लेखन:
प्रथम-श्रीरंग खटावकर (तरुणाई)
द्वितीय-स्मिता दातार (ती येते आणिक जाते), दिग्दर्शक: प्रथम-हर्षदा बोरकर (अनोळखी)
द्वितीय-सुषमा भागवत (ती येते आणिक जाते), अभिनेता: प्रथम-योगेश केळकर (तरुणाई), द्वितीय-योगेश खांडेकर (अनोळखी), अभिनेत्री: प्रथम-अस्मिता भल्ला (अनोळखी), द्वितीय-शब्दुली सुतार (ती येते आणिक जाते), तृतीय-तृप्ती तासगावकर (साठी), संगीत: प्रथम-मंदार पाटील (ती येते आणिक जाते), प्रकाश: प्रथम: श्याम चव्हाण (अनोळखी), द्वितीय-यश सुर्वे (साठी), नेपथ्य: प्रथम-विश्वनाथ चांदोरकर (अनोळखी), द्वितीय-चारुदत्त वैद्य (ती येते आणिक जाते)

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600