महाराष्ट्र
प्राजक्ता माळी प्रकरणात अखेर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी
बीड : धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या हेतूने भाष्य केल्याचा आरोप करत प्राजक्ता माळी हिने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसंच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. प्राजक्ता माळीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विविध कलाकारांनीही दिला पाठिंबा दिला होता. विविध स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर आज अखेर सुरेश धस यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून परळीत आयोजित केल्या जाणाऱ्या इव्हेंट्सवर बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्याने भाजप आमदार सुरेश धस वादात सापडले होते.
सुरेश धस म्हणाले की, "प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ काढण्यात आला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो," असं धस यांनी म्हटलं आहे. "माझ्याकडून काहीही चुकलेलं नाही. मात्र तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे," अशीही भूमिका सुरेश धस यांनी मांडली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600