जिल्हा

बदलापूर येथील आरटीओ कार्यालयाला तत्वतः मंजुरी

बदलापूर येथील आरटीओ कार्यालयाला तत्वतः मंजुरी
बदलापूर येथील आरटीओ कार्यालयाला तत्वतः मंजुरी फोटो: ठाणे वैभव
मुरबाड: मुरबाड मतदारसंघातील कुळगांव-बदलापूर येथे उप प्रादेशिक कार्यालयाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्वतः मंजुरी दिली. याबाबत आमदार किसन कथोरे सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणी संदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानभवनातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपस्थित राहून कथोरे यांनी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. ‘परिवहन विभागाने नगरपरिषदेकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून जागा ताब्यात घ्यावी. मी त्यास मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देतो,’ अशा सूचना परिवहन आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. सध्या बदलापूर येथे वाहन चालक पथ तसेच स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. बदलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला हिरवा कंदील मिळाल्याने मी करीत असलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे, असे आमदार किसन कथोरे म्हणाले. यापुढे लायसन्स काढणे, नूतनीकरण करणे, परमिट काढणे, वाहन रजिस्टेशन करणे, नंबर घेणे यांसह वाहनांसंदर्भातील सर्व कामे आता बदलापूर येथेच होणार आहेत. त्यामुळे बदलापूर आणि परिसरातील वाहन चालकांना कल्याण कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. बदलापूर, मुरबाड, अंबरनाथ शहर आणि अंबरनाथ ग्रामीणमधील वाहनधारकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. याप्रसंगी परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, विवेक भीमनवर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. बारकूल, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालय, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600