जिल्हा

अरुप्रित टायगर्सची चौगुले स्पोर्ट्सवर एका धावेने मात

ठाणेवैभव करंडक स्पर्धा ठाणे: ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ब गटात झालेल्या लढतीत अरूप्रित टायगर्सने चौगुले स्पोर्ट्सवर एका धावेने मात केली. तत्पूर्वी रूट मोबाईल विरुद्ध डीटीडीसी ही अ गटातील लढत रूट मोबाईलने खेळण्यास असमर्थता दर्शविल्याने रद्द झाली. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली ब गटातील पहिली फेरी मोठ्या थरारक अवस्थेत संपली. अरुप्रीत टायगर्सची २३० धावसंख्या पार करण्यासाठी चौगुले स्पोर्ट्सला अवघी एक धाव कमी पडली. विजयी संघातर्फे ऋषिकेश पवारने अवघ्या ४० चेंडूत तीन चौकार आणि आठ उत्तुंग षटकारांसह ८० धावांची खेळी साकारून अरुप्रितच्या डावास आकार दिला. फरहान शेखने ३१ धावांत चार बळी घेतले. २३० धावांचा पाठलाग करताना चौगुले स्पोर्ट्सच्या कुलदीप यादवने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत ५३ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ७० तर प्रथम मोरेने ५८ चेंडूत सात चौकार आणि एक षटकारासह नाबाद ६५ धावा फटकावल्या. अजय सिंगमने ४० धावांत दोन तर त्याला साथ देताना निरांकार शर्माने ३० धावांत दोन बळी घेतले. ऋषिकेश पवारची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600