महाराष्ट्र

निवडणुकीचे बिगुल वाजताच शहर झाले बॅनरमुक्त

नवी मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ चे बिगुल शनिवार १६ मार्च रोजी वाजल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे मनपाने शहरातील अनधिकृत बॅनर हटवण्यास सुरुवात केल्याने शहर अनधिकृत बॅनरपासून मुक्त झाले आहे. नवी मुंबई शहरात काही बॅनरबाज अवैध बॅनर लावून शहर विद्रुप करत स्वच्छतेत बाधा आणत असतात. अशा अवैध बॅनरबाजीवर कारवाई करावी म्हणून मनपा आयुक्त दरवर्षी आदेश देऊन विभागवार तक्रार क्रमांक प्रसिद्ध करत असतात. मात्र यातील बहुतांश बॅनर हे राजकीय नेत्यांचे असल्याने मनपा कर्मचारी असे बॅनर काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा बॅनर बाजांवर कारवाई होताना दिसत नाही. मात्र आता लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून राज्यात सात टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नवी मुंबई शहर ठाणे लोकसभा क्षेत्रात मोडत असून २० मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागताच अवैध बॅनरवर कारवाई करण्याचा सपाटा मनपाने लावला आहे. या कारवाईमुळे शहरातील चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600