जिल्हा

चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल, डिझेल वाहनांनाच पसंती

चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल, डिझेल वाहनांनाच पसंती
चार्जिंग स्टेशन नसल्याने पेट्रोल, डिझेल वाहनांनाच पसंती फोटो: ठाणे वैभव
ठाणे पालिकेचा शंभर चार्जिंग स्टेशनचा प्रस्ताव कागदावरच ठाणे : ई वाहनांसाठी शहरात १०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच असल्याने ठाणेकरांनी पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांनाच पसंती दिली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या एक लाखांपेक्षा अधिक नवीन वाहनांपैकी केवळ ३१७६ ई वाहनांचा समावेश आहे. देशभरात २०३० पर्यंत वीजेवरील वाहनांची वाहतूक सुरु करण्याचे धोरण केंद्र शासनाने आखले असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरात अशा वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार महापालिकेच्या निधीतून शहरात १०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. मात्र हे चार्जिंग स्टेशन कोणत्या ठिकाणी उभारणार याबाबत पालिका स्तरावर अद्याप अस्पष्टता आहे. महिंद्रा आणि कायनेटीक ग्रीन या कंपन्यांनी स्टेशन उभारणीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिका निधीतून चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळला आणि संबंधित कंपन्यांना स्टेशन उभारणीसाठी केवळ जागा उपलब्ध करून देण्याचे पालिकेने निश्चित केले होते. याशिवाय, संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून शहरात वीजेवरील वाहन उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही महापालिका करणार होती. यासंबंधीच्या सामंजस्य करारावरही संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नोव्हेंबर २०१८ रोजी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. जानेवारी २०१९ पर्यंत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, असा दावा देखील पालिकेने केला होता. त्यानुसार शहराच्या विविध भागात स्टेशन उभारण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र चार वर्षे उलटूनही हा प्रस्ताव कागदावरच असून केलेली टेंडर प्रक्रियेत हा प्रस्ताव अडकला असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनच उपलब्ध नसतील तर ई वाहने घेणार कशी असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंद झालेल्या वाहनांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ८२,८५६ दुचाकीची नोंदणी झाली आहे .तर २३०८९ इतर वाहनांचा समावेश आहे. यात केवळ ३,१७६ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहेत. मागील वर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात एक लाख २६,९५९ नवीन वाहनांची नोंद झाली. मात्र यातील केवळ ३,१७६ वाहने ही इलेक्ट्रिक आहेत. ठाणे शहरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची पुरेशी अशी व्यवस्था नाही. यामुळे ठाणेकरांची अजूनही डिझेल आणि पेट्रोल वाहने खरेदी करण्यालाच पसंती असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600