जिल्हा

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर फोटो: ठाणे वैभव
कल्याण : शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सत्ताधारी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणातील इतर तीन आरोपींच्या जामिनासाठीही त्यांच्या वकिलांकडून लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रमेश म्हात्रे यांना यापूर्वी 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे वकील ॲड. गणेश पाटील, ॲड. मुजाहिद काझी आणि ॲड. आनंद पत्की यांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली. मंगळवारी दुपारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी जामिनाला विरोध केला. रमेश म्हात्रे यांना जामीन दिल्यास समाजात तेढ निर्माण शकतो तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. यावर बचाव पक्षाने प्रतिवाद करत म्हात्रे यांचे वय 73 वर्षे असून ते आजारी आहेत, त्यांच्यावरील अनेक जुन्या प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तसेच संबंधित घटनेच्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आले होते, ते कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे गेले नव्हते. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचेही बचाव पक्षाने न्यायालयात नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. अखेर सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना 50 हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600