जिल्हा
निलंबित उपायुक्त पाटोळे यांना जामिन
निलंबित उपायुक्त पाटोळे यांना जामिन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: लाच प्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे आणि इतर दोन जणांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे, त्यामुळे तब्बल १७ दिवसांनी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या १ ऑक्टोबर या वर्धापन दिनी बांधकाम व्यवसायिकाकडून २५ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी श्री. पाटोळे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर इतर दोन जणांना देखिल अटक करण्यात आली होती. चार दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी होऊन अखेर तीन जणांना प्रत्येकी एक लाख रुपयाच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे या सर्व जणांची दिवाळी कारागृहाबाहेर होणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600