जिल्हा

उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक

उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने खडेगोळवली गंगा विहार येथून एका बांगलादेशी महिलेला अटक केली. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी रोजी कल्याण पूर्व येथील खडेगोळवली गंगाविहार येथून दुपारी साडेचार वाजता वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी तरुणीला जेरबंद केले. विशेष म्हणजे २०२४च्या डिसेंबर महिन्यात सात बांगलादेशींना शोधण्याची यशस्वी कामगिरी शहर क्राईम ब्रँचने केल्याने, ही संख्या आता ८ वर गेली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बबन बांडे, महिला पोलीस कुसुम शिंदे यांनी माहितीच्या अनुषंगाने पंचासह खडेगोळवलीमध्ये सापळा कारवाई करून २७ वर्षीय सलमा शेख या तरूणीला ताब्यात घेतले. सलमा ही मुस्तफापुर, मदारीपुर, जिल्हा सिक्की, बांगलादेश येथील असल्याचे कागदोपत्रांवरून स्पष्ट झाले. सलमा ही यापूर्वी मुंबई येथे तर गेल्या सहा महिन्यांपासून खडेगोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. डिसेंबर २०२४ मध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा बांगलादेशी शोधून त्यांना जेरबंद करण्यात शहर गुन्हे अन्वेषण विभाग यशस्वी झाले. त्यामध्ये दोन पुरुष सहा महिला असल्याची माहिती कोळी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600