जिल्हा
भिवंडीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस
भिवंडीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस
फोटो: ठाणे वैभव
नारपोली पोलीस स्टेशनची केली होती रेकी
भिवंडी: काही दिवसांपूर्वी वांद्रे गरीबनगर येथे रेल्वेच्या अतिक्रमण केलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यात अनधिकृत मशीदही होती. या मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कारस्थानं रचली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलीकडेच दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय शहजाद भट्टी गँगच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, त्याआधीच दिल्ली पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून भिवंडी संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी केल्याचे समोर आले आहे. तपासात दहशतवादी कटाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या अशरफने नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो आणि परिसरातील पुलाचा 18 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे.
तपास यंत्रणांच्या मते, आरोपींना पोलिस ठाणी व सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या नेटवर्कचे संबंध कथितरित्या शहजाद भट्टी आणि ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’शी असल्याचा संशय असून, आयएसआयच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी तपास यंत्रणेमार्फत सुरु आहे.
अटक दोन्ही आरोपींचे दिल्ली मॉड्यूलशी कनेक्शन समोर आले आहे. या वर्षी एप्रिल-मे महिन्यात यूपी एटीएसने आठ संशयित दहशतवाद्यांना देशविरोधी कारवायांप्रकरणी अटक केली आहे. दिल्ली स्पेशल सेलने पकडलेले सर्व संशयित सोशल मीडियाद्वारे या दोन आरोपींच्या संपर्कात होते. दोन्ही मॉड्यूल पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी हँडल करत होता. शहजाद सोबत या कटात आयएसआय एजंट्स सुद्धा आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.