जिल्हा
२८०० कोटींच्या टीडीआरबाबत वनमंत्र्यांची चुप्पी का? - डॉ. आव्हाड
२८०० कोटींच्या टीडीआरबाबत वनमंत्र्यांची चुप्पी का? - डॉ. आव्हाड
फोटो: ठाणे वैभव
जनहित याचिका दाखल करणार
ठाणे: येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या जमिनीची मालकी डायाभाई एण्ड कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महानगर पालिकेकडून टाकण्यात आले आहे. त्याबदल्यात 2800 कोटींचा टीडीआर देण्यात आला आहे. हे आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आले आहे? याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी मौन का बाळगले आहे, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ.डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने डायाभाई कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरूवातीलाच डायाभाई कंपनीकडून जमीन नको असल्याचे पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली, असे सवाल करून या मागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करीत याविरूद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले. या घोटाळ्यामागे गणेश नाईक यांच्याकडे असलेले वनखाते आहे. वनखात्याची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, अशी गर्जना करणारे गणेश नाईक हा घोटाळा होत असताना गप्प का आहेत, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
येऊरच्या पायथ्याशी असलेली तब्बल १९३ एकर जागा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी पार्क (जैवविविधता उद्यान) म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. या जागेच्या मोबदल्यापोटी 'डी डायाभाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला जवळपास २८०० कोटी रुपयांचा टीडीआर दिला जात आहे. याबाबत डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर डाॅ.जितेंद्र आव्हाड हः पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगरसेवक यासीन कुरेशी, नगरसेविका मनिषा भगत, दिपाली भगत आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.