महाराष्ट्र
ट्रक अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
भिवंडी : शहरातील माणकोली-अंजूरफाटा वाहिनीवर ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवार रात्री ८-३० वाजता घडली.
गुफरान तेजमोहम्मद अन्सारी (४०) असे मयत इसमाचे नाव असून तो नौशाद वाजिद अली अन्सारी याच्यासोबत दुचाकीवरून जात होता. दरम्यान मागून येणारा ट्रकने (क्र. जीजे ३४/टी १२८९ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकचे मागचे चाक जमिनीवर पडलेल्या गुफरानच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी नौशाद वाजिद अली अन्सारी याने नारपोली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कर्णवीर पाटील हे करीत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600