जिल्हा

कोपरी-पाचपाखाडीत भाजपचे 'बीएलए' जाणार घरोघरी

ठाणे: भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेंच्या पार्श्वभूमीवर कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात भाजपचे 'बीएलए' (बुथ लेव्हल एजंट) घरोघरी भेटी देणार आहेत. या अनुषंगाने ठाणे लोकसभा निवडणुक प्रमुख व राज्यसभेचे माजी सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत कोपरी-पाचपाखाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. ठाण्यातील शहनाई हॉलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बीएलए-२ प्रशिक्षण वर्गात मतदार नोंदणी व संघटनात्मक कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, बीएलए कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यात आला. या उपक्रमांतर्गत भाजपचे बीएलए घरोघरी भेटी देणार असुन मतदारांची पडताळणी करणार आहेत. त्याचबरोबर नवमतदार युवक, युवती तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना तातडीने नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात ठाणे लोकसभा निवडणुक प्रमुख व राज्यसभेचे माजी सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोपरी- पाचपखाडी विधानसभा निवडणूक प्रमुख आमदार निरंजन डावखरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, संघटन सचिव विलास साठे, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा संयोजक कृष्णा भुजबळ, माजी नगरसेवक भरत चव्हाण, कैलास म्हात्रे, नीरज सिंग, सचिन सावंत, भूषण पाटील आदींसह चार मंडल अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, सोसायटी निहाय कार्यक्रम निश्चिती, शक्ती केंद्र प्रमुखांची निर्मिती अशा संघटनात्मक मुद्द्यांवर भर देण्यासह सरकारची विविध विकासकामे आणि विविध योजना प्रभावीपणे मतदारांपर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने संयोजन आणि समन्वयाची जबाबदारी पदाधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600