जिल्हा

कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत रामनाथ मेंगाळ यांना कांस्य

दक्षिण आफ्रिकेत ठाण्याच्या वाहतूक पोलिसाचा विक्रम ठाणे: शहरातील वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल रामनाथ मेंगाळ यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत कांस्य पद मिळविले. दक्षिण आफ्रिकेतील अतिशय खडतर अशी मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 20 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. 10 अंश तापमानात आयोजित करण्यात येणारी 89 किलोमीटरची ही स्पर्धा मेंगाळ यांनी अवघ्या 10 तास 58 मिनिटात पूर्ण केली. 11 जून 2023 रोजी सकाळी 5:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा होती. मेंगाळ यांच्याबरोबर महाराष्ट्र पोलीस खात्यातून तीन अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मेंगाळ यांनी सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत आपले नाव कोरले आहे. गेल्या वर्षी 28 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेत मेंगाळ यांनी सलग 9 तास 37 मिनिटांचा विक्रम केला होता. रेकॉर्ड करण्यात आला होता. सलग दोन वर्षे या स्पर्धेत सहभाग नोंदविल्यामुळे त्यांना 'बॅक टू बॅक' या पदकाने सन्मानित करण्यात आले. ठाणे वाहतूक शाखेत कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असताना स्वतःच्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष देत या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मेंगाळ यांचे वरिष्ठ सहकारीही उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600