महाराष्ट्र

कोपरखैरणेत ४ लाख ५० हजारांचे ब्राऊन शुगर जप्त

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका लावला असून तीन दिवसाच्या आत दुसऱ्यांदा कारवाई करत साडेचार लाखांचे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ जप्त केले आहे.याय एक जाणला  अटक करण्यात आली असून एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आहे.
कोपरखैरणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ मधील रहिवासी संकुलामधून ३१ लाख ६० हजारांचे एम डी व ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ जप्त करून यात २ महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी च्या रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार सागर टकले हे गस्त घालत असताना सेक्टर १० येतील ओम ज्योत अपार्टमेंट जवळ एक महिला व पुरुष संशयितरित्या आढळून आल्याने त्यांच्या जवळ चौकशी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तेथून पळ काढत असताना सागर टकले यांनी पाठलाग करून संतोष मणिराम राठोड वय ४५ वर्ष याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या जवळून ४५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. ज्याचे बाजार भाव ४ लाख ५० हजार असून यात संतोष राठोड याची पत्नी सागर संतोष राठोड वय ४० वर्ष ही अंधाराचा फायदा घेऊन तिच्या जवळ असलेल्या अंमली पदार्थाचा साठा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली असून या बाबत पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600