महाराष्ट्र

वसईत भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या !

बघ्यांच्या घोळक्यात माणुसकी हरवली वसई : भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचं नाव रोहित यादव असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणामुळे मुंबईसह उपनगरात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गावराई पाडा येथे सकाळी रोहितने आपल्या एक्स गर्ल्डफ्रेंडवर लोखंडी पान्याने वार केले. एकदा नाही तर तब्बल 15 वेळा त्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, त्यामधील एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आला नाही, फक्त पाहात राहिले किंवा व्हिडीओ काढत राहिले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला. वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरातली सकाळी साडेआठ वाजता रोहितने डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी आरतीला जमिनीवर पाडलं. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा हल्ला केला. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला. आरती निपचीत पडली. तीने प्राण सोडले होते. मात्र रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया क्यूं किया... असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवला अटक केली. रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600