जिल्हा

घरफोड्या करणारा चोरटा अटकेत

डोंबिवली: कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील बंद घरे, दुकाने, हाॅटेल्स मध्यरात्रीच्या सुमारास फोडून तेथून लाखो रूपयांचा ऐवज साथीदाराच्या मदतीने चोरून नेणारा उल्हासनगरमधील एका चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या फरार साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
अनिल रुपवते (२०) असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील चोरीची घटना घडल्या ठिकाणापासून ते आरोपीच्या उल्हासनगर घरापर्यंतचे एकूण ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफिती तपासून पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. पोलिसांनी रूपवते याच्याकडून दोन लाखाहून अधिक किमतीचे १२ मोबाईल फोन, एक दुचाकी, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला. न्यायालयाने रूपवते याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600