जिल्हा

कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे

कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे
कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमित मोहरे फोटो: ठाणे वैभव
कल्याण: ‘द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी लेखापाल अमित मोहरे यांची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. कल्याण-डोंबिवली शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, या शहरातून सनदी लेखापाल होणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेऊन या विद्यार्थ्यांना शहरात दर्जेदार मार्गदर्शन, प्रशिक्षण केंद्र असावे. कल्याण, डोंबिवलीतील सनदी लेखापाल विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षणासाठी, अभ्यासिकेसाठी बाहेरच्या शहरात जाण्याची गरज लागू नये अशा विधायक आणि दूरदृष्टीने आम्ही काम करणार आहोत, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सीए मोहरे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सीए प्रदीप मेहता, सचिव सीए अमृता जोशी, कोषाध्यक्ष सीए ईश्वर रोहरा, विकासाध्यक्ष सीए रोहन पाठक, माजी अध्यक्ष सीए राकेश अग्रवाल हे पदाधिकारी आहेत. कार्यकारिणी सदस्यांमध्ये सीए गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता, सीए विपुल शाह यांचा समावेश आहे. शहरातील जुनेजाणते ज्येष्ठ सनदी लेखापाल सल्लागार म्हणून कार्यरत असणार आहेत. द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली शाखेअंतर्गत भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ग्रामीण पट्ट्यातील कर्जत, कसारा परिसराचा समावेश आहे. या शाखांच्या माध्यमातून चार हजार ८०० सदस्य शाखेत सक्रिय आहेत. सनदी लेखापाल परीक्षेचा अभ्यास करणारे तेरा हजाराहून अधिक विद्यार्थी संस्थेच्या कामाशी निगडित आहेत. संस्था पदाधिकारी वर्षभर सनदी लेखापाल विषयाशी संबंधित विषयावर, या संदर्भात येणारे नवीन नियम, कायदे याविषयी आपल्या संस्थेतील सदस्य, नवोदित मंडळींना चर्चासत्र, परिसंवादातून मार्गदर्शन करतात. सनदी लेखापाल विषयांचा अभ्यास करणाऱ्या शहरी, ग्रामीण, गरजू, गरीब मुलांचा यामध्ये समावेश असतो, असे अध्यक्ष मोहरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600