जिल्हा

डेटिंगसाठी हॉटेलात बोलावून १५ हजाराचे बिल करायचे!

डेटिंगसाठी हॉटेलात बोलावून १५ हजाराचे बिल करायचे!
डेटिंगसाठी हॉटेलात बोलावून १५ हजाराचे बिल करायचे! फोटो: ठाणे वैभव
सहा महिलांसह २२ जणांच्या टोळीला बेड्या नवी मुंबई: डेटिंग अ‍ॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, सहा महिलांचाही समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. फिर्यादी तरुणाची TINDER अ‍ॅपवरून ओळख करून बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून १४,७०० रुपये क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या १५ पुरुष आणि सहा महिलांना ताब्यात घेतले. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत असे. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते. पोलिसांनी या कारवाईत 27 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600