जिल्हा

जागावाटव ताणल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ

जागावाटव ताणल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ
जागावाटव ताणल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगरमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी आणि गोंधळ उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात प्रचंड गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अनेक राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या एबी फॉर्मवरून तसेच उमेदवार निश्चितीवरून वाद सुरू होते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार पक्ष कार्यालयाबाहेर तासन्‌तास प्रतीक्षेत उभे होते. उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतरही शेवटच्या काही मिनिटांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहरातील चार प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी अनेक पक्षांनी शेवटच्या क्षणीच उमेदवारी अर्जांचे वाटप केल्याने दुपारी १२पासूनच निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली. दुपारनंतर काही दिग्गज उमेदवारांची नावे जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मिरवणुका काढल्याने गर्दीत आणखी भर पडली. युती व आघाडीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचीही संख्या वाढली होती. परिणामी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झालेली प्रचंड गर्दी पाहता सर्वच निवडणूक कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांनाही तणावाचा सामना करावा लागला. उमेदवारांसोबत येणाऱ्या पदाधिकारी व समर्थकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवताना अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले असून पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. दरम्यान, बहुतांश राजकीय पक्षांचे उमेदवार वाहनांच्या ताफ्यासह निवडणूक कार्यालयात दाखल झाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600