महाराष्ट्र

ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्राची मान्यता

* १२,२०० कोटींचा खर्च * २९ किमी लांबीचा मार्ग * २६ किमी उन्नत आणि तीन किमी भूमिगत मार्ग * २२ स्थानकांपैकी २० उन्नत आणि दोन भुयारी ठाणे : वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे. दरम्यान अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतुकोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे. सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २९ किमी अंतराच्या या प्रकल्पात २२ स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः सन २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ अंदाजे ६.४७ लाख प्रवाशांना मिळणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600