महाराष्ट्र

पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढला असून काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पालघरमध्ये सोमवारी, तर ठाणे परिसरात सोमवार, मंगळवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१-३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. मात्र हवेतील आर्द्रतेत वाढ होऊन उकाडा वाढणार आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ केंद्रात कमाल तापमान २ अंशानी अधिक नोंदले गेले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600