महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि आमदार ठरला !

दिव्यात ठाकरे गटाच्या बॅनरबाजीने शिंदे गटाला डिवचले ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी दिवा शहर आणि कल्याण ग्रामीण परिसरात उद्धव साहेब मुख्यमंत्री,भोईर साहेब आमदार अशा आशयाचे बॅनर लावले आहेत, त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन-तीन महिन्यात विविध उपक्रम राबवून शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील या स्थानिक राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या असून त्यांनी बॅनरच्या माध्यमातून शिंदे गट व मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कल्याण ग्रामीणमध्ये डिवचले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर असतील हेच त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून रोखठोकपणे सांगितले आहे. दिव्याचे ठरलंय, उद्धव साहेब मुख्यमंत्री, भोईर साहेब आमदार अशा आशयाचे बॅनर लावून ज्योती पाटील यांनी शिंदे गटाच्या व मनसेच्या संभाव्य उमेदवारांना डिवचले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600