जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कल्याण-डोंबिवलीत

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कल्याण आणि डोंबिवलीत येत आहेत. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) येथे सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली रोड येथील समर्थ नगरमधील स्वामी समर्थ मठाजवळ संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकाचा समाचार घेणार आहेत. कल्याण ग्रामीण मतदार संघात मागील अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून महायुती सरकारने विविध विकास कामे केली आहेत. यामुळे या परिसरातील विकासाचा वेग वाढला असून हा विकासाचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकारच्या हातात सत्ता द्या आणि कल्याण ग्रामीण मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत. या सभेला महायुतीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600