महाराष्ट्र

सावत्र पित्याकडून चिमुरड्याची हत्या

ठाणे : नकोशा झालेल्या चार वर्षीय मुलाची सावत्र बापाने गळा आवळून मारहाण करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती इमारतीत घडली. मोहम्मद दिलशान इम्रान असे नराधम पित्याचे नाव असून आर्यन असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी दिली. घोडबंदर रोड परिसरातील दोस्ती एम्पेरियाजवळ असणाऱ्या एमएमआरडीए इमारतीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय दिलशान इम्रान याने रेश्मा नावाच्या महिलेबरोबर लग्न केले होते. रेश्माचे हे दुसरे लग्न होते. तिला पहिल्या पतीपासून आर्यन नावाचा चार वर्षांचा मुलगा असल्याचे तिने दिलशानपासून लपवले होते. कालांतराने रेशमा आर्यनला घेऊन दिलशान आणि ती राहत असलेल्या घरी आली. मात्र या घटनेचा दिलशान याला प्रचंड राग आला. त्यामुळे तो आर्यनचा राग करू लागला. याच रागातून त्याने २८ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याचा सुमारास आर्यनचा गळा आवळून त्याला लोखंडी सोफ्यावर आपटले. यामध्ये दुखापत होऊन आर्यनचा मृत्यु ओढवला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600