जिल्हा

झिकाशी दोन हात करण्यासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज

३० रुग्णशय्यांचा अद्यावत कक्ष ठाणे : पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोके वर काढले असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचे वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाने सिव्हिल रुग्णालयात झिकाग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. ३० बेडच्या अद्ययावत कक्षाबरोबर औषधसाठा, आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात थंडीचा संमिश्र अनुभव सर्वजण घेत असताना, बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झालेली बघायला मिळत आहे. अशातच राज्यात ठिकठिकाणी झिका व्हायरसचे लोण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून या साथीचा रोग पसरणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे, झिका व्हायरस रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हील रुग्णालयात करण्यात आली आहे. मुंबईत झिका व्हायरसची साथ पसरत असल्याचे सांगितले जात असल्याने ठाणे जिल्ह्यात झिकाची साथ पसरल्यास यावर त्वरित उपचार मिळणे आवश्यक आहे. यामुळे ५० बेड असणाऱ्या कक्षात उपचरासाठी लागणारी सर्व आयुधे सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहेत. झिका व्हायरसची माहिती प्रसार माध्यमावर सांगण्यात येत असली, तरी खबरदारी म्हणून सिव्हील रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज ठेवली आहे. डासांमुळे झिका व्हायरस पसरत असून, यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र गर्भवती महिलांनी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी दिला. झिका विषाणू एडिस डासामुळे पसरतो. याची प्रमुख लक्षणे ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे अशी आहेत. दोन ते तीन दिवस यापैकी काही लक्षणे दिसल्यास रक्त तपासणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करावेत, असे वरिष्ठ फिजिशियन श्रीजीत शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600