महाराष्ट्र
सफाई कर्मचाऱ्याचे ‘एलएलबी’मध्ये यश
ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा सफाई कामगार महेंद्र शिंदे यांनी ‘बीएसएल एलएलबी ‘ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व्यसनमुक्ती जनजागृती सेवा समितीच्या वतीने रविवारी २८ जुलै २४ रोजी सन्मान करण्यात आला.
महेंद शिंदे यांचे वडील पिठूराम शिंदे यांच्या निधनामुळे नववीनंतर अर्धवट शिक्षण सोडून त्यांना वडिलांच्या जागी वारसा हक्काने ठाणे महापालिकेत २००७ साली सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करावी लागली. परंतु शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे त्यांनी सन २०१२ मध्ये दहावी आणि २०१८मध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून ‘बी.कॉम’ परीक्षा दिली. यंदा बीएसएल एलएलबी परीक्षा देऊन त्यात घवघवीत यश मिळवले.
महेंद्र शिंदे यांच्या या यशामुळे सफाई कामगारांना प्रेरणा मिळाली आहे, असे कामगार नेते जगदीश खैरालिया यांनी सांगितले. यापुढे एलएलएम पदवी मिळवण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सफाई कामगारांचा जीवन संघर्ष पुस्तक’ आणि पुष्पगुच्छ देवून समता कट्टा येथे महेन्द्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया, अध्यक्ष अजय राठोड, उपाध्यक्ष नरसी•ााई झाला, सचिव संजय धिंगान, माजी अध्यक्ष ललित मारोठिया, दिलीप चौहान आणि समता विचार प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600