जिल्हा

आपला दवाखान्यातील ६० पेक्षा अधिक परिचारिकांना नारळ

परिचारिकांची पालिकेच्या आरोग्य विभागात धडक ठाणे :खासगी नर्सिंगचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नसल्याचे कारण पुढे करत कोणतीही पूर्व सूचना न देता ६० हून अधिक नर्सेसना आपला दवाखान्याच्या संचालकांनी कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. तसेच दोन महिन्यांचे वतन देखील अदा करण्यात न आल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी आपला दवाखान्यातील परिचारिकांनी आरोग्य विभागाकडे धाव घेत, उप वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत व्यथा मांडली. यावेळी उप वैद्यकीय अधिकारी यांनी आपला दवाखान्याचे संचालक यांच्याशी चर्चा केली असता, संचालकांनी देखील वेतन अदा करण्याबाबत सकारात्मक दर्शविली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. ठाणे शहराचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्याच बरोबर लोकसंख्येत देखील वाढ होत आहे. अशातच शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्याची सुविधा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उपल्बध व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाकडून पावके उचलण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरातील गोरगरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर वन रुपी क्लिनिकच्या माध्यामतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेडोंगो कंपनीच्या माध्यामतून ठाणे पालिका क्षेत्रात आपला दवाखाना सुरू करण्यात आला. या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना मिळणाऱ्या योग्य आरोग्य सुविधेमुळे अल्पावधीतच हा दवाखाना लोकप्रिय होऊ लागला. असे असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून या दवाखान्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे. अशातच मंगळवारी खासगी नर्सिंगचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नसल्याचे कारण पुढे करत कोणतीही पूर्व सूचना न देता ६० हून अधिक नर्सेसना आपला दवाखान्याचे संचालकांनी कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले. तसेच दोन महिन्यांचे वतन देखील अदा करण्यात न आल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी आपला दवाखान्यातील परिचारिकांनी आरोग्य विभागाकडे धाव घेत, उप वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत व्यथा मांडली. यावेळी उप वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे यांनी आपला दवाखान्याचे संचालक यांच्याशी चर्चा केली असता, संचालकांनी देखील वेतन अदा करण्याबाबत सकारात्मक दर्शविली असल्याची माहिती उप वैद्यकीय अधिकरी राणी शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600