जिल्हा

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा उपचारांअभावी मृत्यू?

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा उपचारांअभावी मृत्यू?
काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा उपचारांअभावी मृत्यू? फोटो: ठाणे वैभव
कळवा रुग्णालयाविरोधात काँग्रेस आक्रमक ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि भोंगळ कारभारामुळे काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कळवा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) शेट्टी यांच्या पत्नी संगिता शेट्टी यांना त्रास होत असताना आनंद दिघे हृदयरोग केंद्रात आणण्यात आले होते. मात्र, रुग्णशय्या उपलब्ध असूनही ती उपलब्ध नसल्याचे सांगत रुग्णाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्राथमिक उपचारदेखील न दिल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. “गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. हा केवळ निष्काळजीपणा नसून व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,” अशी घणाघाती प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिली. पीडित कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून, कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले असले तरी काँग्रेसने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ६ जूनपर्यंत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास ठाणे महापालिका आणि रुग्णालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600