जिल्हा
थकबाकीपोटी पाच दुकानांसह क्रिटीकल केअर सेंटर सिल
कल्याण-डोंबिवली महापालिकेची कारवाई
कल्याण : डोंबिवली (पूर्व) ग प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांना वारंवार नोटीस देऊनसुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाच दुकानांसह क्रिटीकल केअर सेंटर सिल केले आहे.
आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाचे सहायक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांच्या पथकाने थकबाकीपोटी असलेल्या मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई आज दिवसभरात केली.
डोंबिवली (पूर्व) नांदिवली रोड येथील पाच दुकान गाळे 11 लाख 37,234 थकबाकीपोटी सिल करण्यात आले. डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड येथील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर रक्कम सात लाख 16,743 इतक्या थकबाकीपोटी सिल करण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600