जिल्हा

दहिसर टोल नाक्याची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार भाईदर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर पथकर नाक्यावर होणारी तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने सॅटेलाइट आधारित शुल्कवसुली (टोल कलेक्शन) यंत्रणा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पथकर नाक्याचे स्थलांतर सध्या शक्य नसल्याने हा पर्याय स्वीकारण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दहिसर पथकर नाक्यावर गेल्या काही महिन्यांपासून सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने प्रवाशांना तासन्तास वाहतुकीत अडकून पडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पथकर नाक्याचे स्थलांतर करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, स्थलांतरासाठी प्रस्तावित जागेवरून स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाल्याने तो निर्णय स्थगित ठेवावा लागला. दरम्यान, तात्पुरत्या उपाययोजना म्हणून पथकर नाक्याच्या सुमारे शंभर मीटर अंतरावर वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले. तसेच रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करून मार्ग सरळ करण्यात आला आहे. सेवा रस्त्याचे पुनर्निर्माणही अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600