जिल्हा

प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू?

* शास्त्रीनगर रुग्णालयातील घटना, नातेवाईकांचा आरोप डोंबिवली : पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 12 तारखेला घडली. या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला असून विष्णुनगर पोलीसांनी मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करू असे सांगितले. सुवर्णा सरोदे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून त्या डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथे राहत होत्या. महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. सुवर्णा सरोदे या गर्भवती होत्या आणि त्यांना 11 फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली, मात्र ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याचे सांगून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले. काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधारेल असे सांगण्यात आले, पण त्यांच्या प्रकृतीत कुठलाही सुधार दिसून आला नाही. सुवर्णा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, याच दरम्यान महिलेची गर्भाशय (पिशवी) काढण्यात आली व याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना आधी कोणतीही सल्लामसलत न करता केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सायन रुग्णालयात हलविण्याची गरज आहे असे सांगितले. मात्र या दरम्यान तिची आणि आमची भेट होऊ दिली नाही त्यामुळे तिचा मृत्यू दोन तास आधीच झाला असल्याचा आरोप देखील महिलेच्या नवऱ्याने केला आहे .मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने सुवर्णा यांनी अखेरचा श्वास घेतला. तर डॉक्टरांनी कुटुंबीयांना माहिती दिली की, रक्तस्त्राव थांबवता आला नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून, विष्णुनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. प्राथमिक चौकशी सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600