देश-विदेश

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी-शाहांची घेतली भेट

नवी दिल्ली: मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवारी दिल्लीत गेले. दिल्ली दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सहकुटुंब भेट घेतली. दिल्लीत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी या भेटीबद्दलची माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होते, अनेक योजनांमध्ये केंद्राचे सहकार्य होते. त्यामुळे अडीच वर्षात आम्ही खूप काम करू शकलो. मला याचे समाधान आहे की, अडीच वर्षात... कमी कालावधीत खूप मोठ्या काळात होईल असे काम केले. त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासात कुठेही काही कमी पडणार नाही असेही मोदी यांनी सांगितल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600