जिल्हा
उपायुक्त कल्पिता पिंपळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत
उपायुक्त कल्पिता पिंपळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेत उपायुक्त (मु.) पदी कार्यरत असलेल्या कल्पिता पिंपळे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील उपायुक्त, गट-अ संवर्गात तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापनेबाबत ४ नोव्हेंबर रोजी पारित आदेशानुसार एकूण ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेत उपायुक्त (मु.) पदी कार्यरत होत्या. सुमारे तीन वर्षांचा कालावधी झाल्याने महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या आदेशानुसार त्यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तात्पुरत्या पदोन्नतीने बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600