जिल्हा

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप शिंदे

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप शिंदे
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप शिंदे फोटो: ठाणे वैभव
कार्याध्यक्षपदी दीपक शेलार ठाणे : राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या २०२६-२८ या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी रविवार १९ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत 'जायंट किलर' ठरण्याचा मान मिळविला. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी, तर प्राची डिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्यात चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी ७१ मते मिळवत विजय संपादन केला. दीपक दळवी यांना ५० मते मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी ७५ मते मिळवून विकास काटे (५० मते) यांचा पराभव केला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत राजेश शेटकर यांनी ७७ मते मिळवत राहुल क्षिरसागर (४७ मते) यांच्यावर मात केली. दरम्यान, उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दुल (९०), गजानन हरिमकर (७१), अमर राजभर (६५), सचिन देशमाने (५८), नितीन दुधसागर (५५) आणि प्रफुल्ल गांगुर्डे (५४) हे विजयी ठरले. महिला सदस्यपदासाठी सारिका साळुंखे यांनी ८६ मते मिळवत विजय मिळविला. नुतन कार्यकारिणीचे सर्वं स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600