जिल्हा

डिप्लोमसी बाय डॉक्टर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुक्त चर्चा ठाणे: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला `ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून चोख उत्तर दिले. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशांत आपली शिष्टमंडळे पाठवली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. खा.शिंदे यांना जागतिक पातळीवर भारतीयांची बाजू मांडताना आलेला १४ दिवसांचा अनुभव ठाण्यातील जनतेला ऐकता यावा यासाठी ठाणेकर नागरिकांच्या वतीने 20 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील सुप्रिम बँक्वेट हॉल येथे 'डिप्लोमसी बाय डॉक्टर' या मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला संघर्ष आणि युद्धविराम यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले. दहशवादाविरोधी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाची पाऊले उचचली. विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. संयुक्त अरब अमीरात, लाइबेरिया, कांगो लोकतांत्रिक गणराज्य आणि सिएरा लियोन या देशांचा दौरा त्यांच्या नेतृत्वात केला. शिष्टमंडळाने दहशवादाविरोधी `झिरो टॉलरन्स'चा संदेश जगापर्यंत पोहचवण्याचे काम केले. एका तरुण खासदाराला 14 दिवसांचा हा दौरा करण्याची जी संधी मिळाली, त्यांचे अनुभव, देशाचं केलेलं नेतृत्व, हे सगळं प्रत्यक्ष त्यांच्याकडून अनुभवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विविध संस्था, ज्येष्ठ आणि श्रेष्ठांनी एकत्र येऊन डॉ. श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार आणि सोबत मुलाखतीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600