जिल्हा
१८ विधानसभा मतदारसंघात ३२४ अर्जांचे वाटप
तीन उमेदवांरानी सादर केले अर्ज
ठाणे : ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी आजपासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. आज 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 324 नामनिर्देशन पत्राचे वाटप उमेदवारांना करण्यात आले आहे. तर तीन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
भिवंडी विधानसभा मतदारसंघात सात, शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात नऊ, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३५, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात २९, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३२, मुरबाड विधानसभा मतदारसंघात २२, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात नऊ, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात दोन, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात २१, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात चार, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सहा, मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात ३८, ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात १९, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात २०, ठाणे विधानसभा मतदारसंघात १९ , कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात १०, ऐरोली विधानसभा मतदारसंघात ११ आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३१ अशा एकूण ३२४ अर्जंचे वाटप करण्यात आले.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रफुल्ल नानोटे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला. ठाणे विधानसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पक्षाचे उमेदवार यक्शीत पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे दाखल केला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गुरू सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे सादर केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600