महाराष्ट्र

व्यासपीठावर जागा न दिल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

ठाणे : आज कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होण्याआधीच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मानापमान नाट्य रंगले. जिल्हाप्रमुखांना व्यासपीठावर जागा न देता आमदार, शहरप्रमुखांना तसेच इतर पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान दिल्याने कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी अरविंद मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली होती. सध्या अरविंद मोरे कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदेंचा प्रचार करत होते. मोदींच्या सभेत व्यासपीठावर जागा न दिल्याने अरविंद मोरे नाराज होते. अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आणि राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर निमंत्रण नसल्याने शहरप्रमुख पदाचा राजीनामा स्वीकारण्याची मुख्यमंत्र्यांना केली पत्राद्वारे विनंती केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600