जिल्हा

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दीप रांभियाला दुहेरी कांस्य

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दीप रांभियाला दुहेरी कांस्य
वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दीप रांभियाला दुहेरी कांस्य फोटो: ठाणे वैभव
सोनाली मिरखेळकरसह मिश्र दुहेरीतही पदक ठाणे: विजयवाडा येथे पार पडलेल्या ८७व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत दीप रांभिया याने उत्कृष्ट खेळ सादर करत दोन कांस्य पदकांची कमाई केली, तर सोनाली मिरखेळकर हिने त्याच्यासोबत मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया-सोनाली मिरखेळकर या जोडीने सातत्यपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण खेळ करत मुख्य फेरीत साई रामन व एलोरा कोनर यांच्यावर २१-१६, २१-१२ असा सरळ विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी शशांक छेत्री व अनन्या बिष्ट यांना २१-९, २१-१७ असे पराभूत केले. त्यानंतर झालेल्या अटीतटीच्या लढतीत रोहित एम. व ऋदुवर्षिणी रामासामी यांच्यावर १८-२१, २१-१२, २१-१४ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांना कांस्यपदक मिळाले. याच स्पर्धेतील पुरुष दुहेरी प्रकारात दीप रांभियाने अशित सूर्या याच्यासोबत खेळताना आणखी एक कांस्य पदक जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. मुख्य फेरीत त्यांनी अनन्यन बोरा व बोर्निल आकाश यांच्यावर २१-१९, २१-१९ असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत विष्णू केदार कोडे व वेंकट हर्षा यांना २१-१८, २१-१९ असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर स्पर्धेतील आघाडीच्या जोडीविरुद्ध संतोष गजेंद्रन व प्रकाशराज एस. यांच्यावर २१-१५, १९-२१, २१-१८ असा थरारक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. एकाच वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य पदके जिंकणारा दीप रांभिया हा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा मानबिंदू ठरला आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, तांत्रिक परिपक्वता आणि निर्णायक क्षणांतील संयम विशेष प्रशंसनीय ठरला. हे सर्व खेळाडू ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खांडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सुरू असलेल्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेत असून, त्यांना मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड व प्रशिक्षक मंडळाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयात छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मयूर घाटणेकर यांचे मार्गदर्शनदेखील अमूल्य ठरले. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर, तसेच प्रशिक्षक मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांनी प्रशिक्षण सत्रांदरम्यान योग्य तांत्रिक दिशा, फिटनेसची शिस्तबद्ध तयारी आणि विश्लेषणाधारित कोचिंगद्वारे खेळाडूंना आवश्यक धार दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600