जिल्हा

गर्वितला दुहेरी मुकुट, रेवांत शृंगारपुरेला राष्ट्रीय कांस्यपदक

गर्वितला दुहेरी मुकुट, रेवांत शृंगारपुरेला राष्ट्रीय कांस्यपदक
गर्वितला दुहेरी मुकुट, रेवांत शृंगारपुरेला राष्ट्रीय कांस्यपदक फोटो: ठाणे वैभव
आदित्यने गाजवली मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा ठाणे : धुळे जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीचा गर्वित मेहंदीरत्ता याने १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद मिळवत आपल्या कारकिर्दीतील पहिलाच दुहेरी मुकुट पटकावला. गर्वितने १७ वर्षाखालील अंतिम सामन्यात मितेश पवारचा २१-१३, २१-१७ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. तर १९ वर्षाखालील अंतिम फेरीत त्याने मितेश पवारवर २१-१५, १६-२१, २१-१९ असा रोमांचक विजय मिळवत हा किताब जिंकला. अकॅडमीचा आणखी एक उदयोन्मुख खेळाडू रेवांत शृंगारपुरे याने सीआयएससीई नॅशनल्स बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. राऊंड ऑफ ३२ मध्ये नीली अर्जुनवर त्याने १५-१४, १५-६ असा विजय मिळवला. राऊंड ऑफ १६ मध्ये अ‍ॅरॉन सॅमला १५-८, १५-११ ने पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत कणिष्क गर्गवर १५-८, १५-९ ने मात करत उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गर्वित आणि रेवांत या दोघांच्या यशापाठोपाठ ठाणे अकॅडमीच्या सिनिअर खेळाडू आदित्य साजीने देखील आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. माटुंग्याच्या पोद्दार कॉलेजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदित्यने विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत पनवेलच्या पिल्लई कॉलेजचा निर्णायक लढतीमध्ये दुहेरीमध्ये वेदांत सावंतला साथीला घेऊन 15/10, 15/12 असा सनसनाटी पराभव केला व अजिंक्यपद खेचून आणले. या यशामागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाज़िरनीस, राजीव गणपुले,अमित गोडबोले, एकेंद्र दर्जी, प्रसन्नजीत शिरोडकर, फुलचंद पासी, ऋषिकेश जोगळेकर यांची मेहनत व मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी सांगितले की, “बालपणापासून योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे गर्वित, रेवांत व आदित्यसारखे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करत आहेत आणि यापुढे देखील आपले खेळाडू असाच स्तर उंचावत राहतील"

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600