जिल्हा

ड्रोनद्वारे ठेवणार नालेसफाईवर नजर

ठेकेदारांना हलगर्जीपणा पडणार १० हजाराला ठाणे : यंदा नालेसफाईवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक स्पॉटसाठी १० हजार रुपये तसेच सफाई व्यवस्थित न झाल्यास त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडल्यास २५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांप्रमाणे नालेसफाईची कामे करणाऱ्यांचे देखील धाबे दणाणार आहेत. प्रशासनाने कंत्राटदारांना ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार नालेसफाईच्या कामात ठाणे शहरात पावसाळ्याच्या कालावधीत पाणी साचून नागरिकांची होणारी गैरसोय व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नालेसफाईची कामे हाती घेण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजित कालावधीत व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने दक्षता घेतली आहे. तसेच यंदाच्या वर्षी नालेसफाईबरोबरच नाल्यांना जोडण्यात आलेली व रस्त्यांच्या कडेला असलेली गटारे यांची देखील सफाई करण्यात येणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई योग्य पध्दतीने न झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. यावर जरब बसावी म्हणून नालेसफाईचे ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यात येणार असून नालेसफाईत हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नालेसफाई कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर प्रत्येक स्पॉटसाठी १० हजार रुपये तसेच सफाई व्यवस्थित न झाल्यास त्यामुळे रस्त्यावर पाणी साचण्याची घटना घडल्यास २५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दरवर्षी नालेसफाईच्या कामांना १ ते ७ मेपर्यंत सुरवात करण्याचा प्रयत्न पालिकेचा असतो. मात्र ही तारीख अनेकवेळा चुकल्याचेही दिसून आले. यंदा मात्र पालिकेने मार्च महिन्याच्या अखेरीसच निविदा प्रसिध्द केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600