जिल्हा

नालासोपाऱ्यात ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

नालासोपाऱ्यात ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश
नालासोपाऱ्यात ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश फोटो: ठाणे वैभव
वसई : नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात असलेल्या अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स विभागाने धाड टाकली आहे. यात सुमारे १४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन नावाचे अमली पदार्थ व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वसई-विरार शहरात अमली पदार्थांच्या तस्करीसोबतच आता त्यांची निर्मिती करणारे कारखानेही उभे राहू लागले आहेत. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्सच्या पथकाने पेल्हार येथे छापा टाकून अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठीचे साहित्य व काही तयार अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त करून पंचनामा सुरू केला. जवळपास जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत १४ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सातत्याने नालासोपाऱ्याच्या विविध ठिकाणच्या भागात अमली पदार्थ आढळून येत असल्याने नालासोपारा हे अमली पदार्थांचे केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600