जिल्हा

कल्याणमध्ये धुळीच्या वादळाने दाणादाण

कल्याणमध्ये धुळीच्या वादळाने दाणादाण
कल्याणमध्ये धुळीच्या वादळाने दाणादाण फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याणमध्ये आज सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या धुळीच्या वादळाने चांगलीच दाणादाण उडवली. आज सकाळपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अंगाची लाही लाही होत होती. असे असतांना दुपारी काही वेळातच वातावरणामध्ये बदल होऊन धुळीचे वादळ आले. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळामुळे धुळीची चादर पसरली, ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. अचानक हवामान बदलामुळे हे वादळ आले आणि काही वेळातच शमले, परंतु या काळात पत्रे, झाडे आणि वस्तूंची दाणादाण उडवली. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात दोन ठिकाणी घरांवर झाड पडल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेत मदतकार्य सुरु केले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे कल्याण पश्चिम येथील साई शरणम गृह संकुलातील झाडाची भली मोठी फांदी तुटून तीन गाड्यांचे नुकसान झाले. दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वाऱ्यासह धुळीचे वादळ सुरू झाले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी पत्रे उडाली, झाडांच्या फांद्या तुटल्या आणि रस्त्यांवरील फलक कोसळल्याच्या घटना घडल्या. विशेषतः एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनालाही झाडाचा फटका बसल्याचे दिसून आले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेली झाडे हटविणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. एनआरसी कंपनीच्या भिंतीच्या बाजूला, दुर्गा नगर दक्षिण मुखी हनुमान मंदिर नांदिवली रिलॅक्स गार्डन बाजूला, डोंबिवली पूर्व येथे नांदिवली दुर्गा माता मंदिर रोड, दुर्गा नगर मलंग रोड एसटी पेट्रोल पंप समोर कल्याण पूर्व, रामदासवाडी, मोहने, बिर्ला कॉलेज परिसर तसेच कल्याण पूर्वेतील नांदिवली भागातही झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600