न्यूजलेटर्स
प्रमाणामध्ये सर्व काही असावे !
प्रमाणामध्ये सर्व काही असावे !
फोटो: ठाणे वैभव
काय मंडळी! संपली ना परीक्षा! आता काय, सुट्टी सुरू! मज्जाच मज्जा, हो ना! खरंच! परीक्षेनंतर मिळणाऱ्या या उन्हाळी सुट्टीचा आनंद काही वेगळाच असतो. मग वर्षभर सांभाळलेलं पथ्य खुंटीला टांगलं जातं आणि वेगवेगळे पदार ्थखायचा सपाटा सरूु होतो. तळलेला गरमागरम वडापाव, समोसा, कोल्ड्रकिं , आईस्क्रीम, बर्फाचा मस्त लाल, पिवळा, जांभळा गोळा अशी नुसती चंगळ सुरू होते. पण मंडळी, थांबा! एप्रिल, मे महिना म्हणजे कडकडीत ऊन! सतत येणारा घाम आणि घशाला पडणारी
कोरड! ही शमवण्यासाठी थंडगार पदार्थांचा आस्वाद घेण्याप ूर्वी थोडासा विचार करा, या थंडाव्याचा शरीराला काही अपाय होईल का? नव्हे! तो होतोच! मग होते सर्दी , येतो खोकला आणि ताप! काही सुट्टीचे दि वस मग आजारपणातच नि घून जातात. काही मुलं पूर्ण दि वस उन्हात क्रिकेट खेळतात. त्यामुळेही उन्हाचा त्रास होऊन आजारपण येऊ शकते. काहीजण सतत स्क्रीन समोर बसून काहीतरी खात राहतात. त्यामुळे वजन वाढते आणि इतर त्रास जाणवू लागतात. म्हणून बरं का छोट्या दोस्तांनो, सुट्टीच्या दि वसांतही प्रत्येक गोष्ट प्रमाणातच करायची असते बरं! सकाळी वेळेवर उठणे, वेळेवर आवरणे, मग सकाळच्या वेळात पुस्तकांचे वाचन, दपु ारी थोडासा आराम आणि संध्याकाळी ऊन उतरल्यावर मैदानात भरपूर खेळणे. असा आपला नित्यक्रम ठेवल्यास त्याचा छान फायदा होईल. आणि हो, सुट्टीत पर्य टनाचा आनंद घ्यायला वि सरू नका बरं!
- श्रीमती माधुरी सुहास जोशी
मुख्याध्यापिका
पार्ले टिळक विद्याल य मराठी माध्यम
प्राथमि क शाळा
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.